बीडमधील संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू या प्रकरणावरून सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. या दोन्ही कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्च्यामध्ये देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीयदेखील सहभागी झाले आहेत.