Italian Women Chants Shivtandav in Front Of Yogi Aadityanath: महाकुंभमेळ्यातील अनेक फोटो व व्हिडीओ मागील काही दिवसांपासून व्हायरल झाले आहेत. या क्लिप्समध्ये अनेकदा देशविदेशातून आलेले साधू, संन्यासी, बाबा पाहायला मिळाले आहेत. मात्र आता इटलीतून भारतात महाकुंभमेळ्यासाठी आलेल्या दोन महिलांचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या महिलांनी प्रत्यक्ष योगी आदित्यनाथ यांच्यासमोर हात जोडून शिवतांडव स्तोत्र म्हणून दाखवलं आहे. व्हिडिओमध्ये त्यांचे उच्चर ऐकून सगळेच थक्क झाले आहेत.