Saif Ali Khan Insurance Claim Document : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी १६ जानेवारीच्या मध्यरात्री राहत्या घरी चाकूहल्ला करण्यात आला. दरोडेखोराने अभिनेत्यावर तब्बल ६ वार केले होते. यानंतर सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सध्या सोशल मीडियावर सैफ अली खानचं रुग्णालयाचं बिल किती झालं? याची प्रत व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्याला डिस्चार्ज कधी देण्यात येईल याची तारीख सुद्धा नमूद करण्यात आली आहे.