Uday Samant: “शिंदेंना संपवून नवीन ‘उदय’पुढे येईल”, असं सूचक विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी देखील दावा केला.”उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहेत अशी माझी माहिती आहेत,जेव्हा सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता पण एकनाथ शिंदे सावध झाले”, असं संजय राऊत म्हणाले. आता विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.