ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे निकष पू्र्ण करतील त्या महिलांनाच आता योजनेचा लाभ घेता येईल. तर निकषात न बसणाऱ्या महिलांनी आपले अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे योजनेचे पैसे नक्की मिळणार की नाही? याबाबत
महिलांमध्ये संभ्रम आहे. याविषयी अजित पवार यांनी जालन्यात बोलताना पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली आहे. गरीब कुटुंबातील महिलांसाठी ही योजना आहे. जी महिला आयकर भरते, ६५ हजार रुपये पगार घेते त्यांच्यासाठी १५०० नाहीत, असं अजित पवार म्हणाले.