कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला शनिवारी विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं. आता या प्रकरणी आज सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर पीडित कुटुंबावा १७ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी असा आदेशही न्यायालयाने सरकारला दिला आहे. Live Law ने हे वृत्त दिलं आहे. याआधी दिवसभर या प्रकरणी सुनावणी पार पडली. दरम्यान, या घटनेनतंर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तसंच आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.