Guardian minister of Maharashtra 36 Districts: Aआम्हाला बालकमंत्री नाही पालकमंत्री द्या! असं म्हणत शनिवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर संतप्त शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद आता राजकीय पटलावर उमटलेत. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून पालकमंत्र्यांच्या नियुक्तीबाबत मोठा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलाय. झालं असं की, दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावे १८ जानेवारी राजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत अनेकांना सहपालकमंत्रीपदही मिळालं. तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मंत्र्यांना संधी देण्यात आली नाही. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे व्यक्त केली होती. दरम्यान, या गोंधळात आता नवा ट्विस्ट आला आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री पदाची यादी जाहीर होण्यापासून ते आता दोन जिल्ह्यांच्या नियुक्ती स्थगित करेपर्यंतच्या २४ तासात असं काय काय घडलं हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया.