बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या एनकाऊंटरवरून अनेक प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. अशातच आता अक्षयच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. त्याचबरोबर बंदुकीवर अक्षयच्या बोटांचे ठसे नाहीत, असंही नमूद करण्यात आलं आहे. आज पार पडलेल्या सुनावणीत नेमकं काय घडलं, न्यायालयाने काय म्हटलय याविषयी सविस्तर जाणून घेऊ.