Saif Ali Khan Stabbed Accused Arrested: बारीक अंगकाठी, विस्कटलेले केस, काय चाललंय याचा अजिबात थांगपत्ता नसलेला भाव चेहऱ्यावर घेऊन वावरणाऱ्या एका ‘मोहम्मद’ ने मागील पाच दिवसांत सैफ अली खानचं कुटुंब, कपूर फॅमिली, राज्य सरकार, मुंबई पोलीस सगळ्यांच्याच नाकी नऊ आणले होते. मात्र त्याची हुशारी मुंबई पोलिसांच्या कर्तबगारीसमोर फेल ठरली आणि आता अखेरीस मोहम्मद इलियास शरिफुल उर्फ विजयदास हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. एक पराठा, भुर्जी, मोबाईलचं कव्हर आणि गूगल पेचं पेमेंट यावरून पोलिसांनी सैफच्या हल्लेखोराला जाळयात अडकवण्यासाठी अशी काही शक्कल लढवली की हे एखाद्या थ्रिलर मूव्हीचं कथानकच ऐकतोय असं आपल्याला वाटू शकतं, नेमका हा तपास लागला कसा हेच आपण आज सविस्तर पाहणार आहोत.