Raju Patil MNS: कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात काय काम केलं असा प्रश्न करत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तर ठाण्यात आगरी लोकांना ठेंगा दाखवल्याचं म्हणत आपला राग व्यक्त केला आहे. राजू पाटील यांचं नेमकं म्हणणं काय ते पाहूया.