Guillain Barre Syndrome: एका महिलेला हाता-पायात झिणझिण्या येऊ लागल्या. नंतर हा त्रास गंभीर होत जाऊन तिच्या स्नायूंमधील कमकुवतपणा वाढत गेला. त्यातून तिला साधी हालचालही करता येणे अवघड बनले. अखेर तपासणीत तिला गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मीळ विकाराचे निदान झाले. डॉक्टरांच्या पथकाने यशस्वीपणे उपचार केल्याने तिने या विकारावर आता मात केली आहे. मात्र आता पुणे महानगर पालिकेकडे अशा प्रकारचे २२ संशयित रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटलमध्ये या आजाराशी संबंधित लक्षणं आढळल्याची तक्रार असणारे रुग्ण दाखल झाल्यानंतर ही माहिती महानगर पालिकेला कळवण्यात आली आहे.