प्रेमभंग झाला म्हणून सूड उगवण्यासाठी केले जाणारे अनेक गुन्हे तुम्ही ऐकले असतील, वाचलेही असतील. असाच एक गुन्हा २०२२ ला केरळमध्ये घडला होता. प्रियकराचाच काटा काढण्यासाठी डाव रचणाऱ्या एक २४ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीला तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने आता फाशीची शिक्षा सुनावली आहे. ग्रीष्मा असं २४ वर्षीय तरुणीचं नाव असून ती केरळच्या इतिहासात फाशीची शिक्षा भोगणारी सर्वांत तरुण महिला ठरली आहे. ग्रीष्माने शेरॉन राज या आपल्या २३ वर्षीय प्रियकराला का आणि कसं संपवलं? नेमके प्रकरण काय? त्याविषयी जाणून घेऊ.