Saif Ali Khan Attacker Mohammad Details : सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम उर्फ विजय दास (३०) याच्याबद्दल पोलीस तपासात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आरोपी सात महिन्यांपूर्वी डौकी नदी ओलांडून भारतात आला होता. नंतर तो पश्चिम बंगालमध्ये गेला आणि तिथे काही आठवडे राहिला. सिमकार्ड मिळविण्यासाठी त्याने तेथील रहिवाशाचे आधार कार्ड वापरले. तिथून मग तो नोकरीच्या शोधात मुंबईला आला. प्राथमिक तपासात आढळलेल्या माहितीनुसार, सैफचा हल्लेखोर नेमका भारतात का, कधी, कसा आला होता याविषयीचे तपशील जाणून घेऊया.