कचरा उचलणे व वाहतूक करण्यासाठी २३०० कोटी रुपयांचं टेंडर काढलं जात आहे, अशी चर्चा ठाणे महानगरपालिकेत आहे. मात्र डम्पिंग ग्राउंड नाही तर हा कचरा टाकणार कुठे? असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी या संदर्भातील व्हिडीओ पोस्ट केला आहे.