Wardha Women Beaten By Husband Wife On Road: वर्ध्यात तरुणीला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्याच्या बुरांडे ले आऊट मधील या तरुणीला मारहाणीच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मोटरसायकलच्या वादातून पती-पत्नीकडून तरुणीला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मारहाण करणाऱ्या पती-पत्नीवर संताप व्यक्त होत असून टीका केली जात आहे.