Walmik Karad, Sudarshan Ghule, Vishnu Chate Viral CCTV: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चर्चेत आहे. ९ डिसेंबर २०२४ या दिवशी त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. यानंतर या प्रकरणातल्या आरोपींना अटकही झाली. तर वाल्मिक कराड हा पोलिसांना ३१ डिसेंबरला शरण आला. दरम्यान सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका लावण्यात आला, काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला. आता वाल्मिक कराड आणि हत्येतील आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे.