Walmik Karad Son: वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड व अन्य तिघांविरुद्ध सोलापूर पोलिसांकडे एक तक्रार नोंदवण्यात आली होती. जबरदस्ती दागिने विकायला लावल्याचा आवर्प करत एका महिलेने केलेल्या तक्रारीनुसार सुरुवातीला सुशील कराडसह अन्य आरोपींना सुद्धा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या प्रकरणी आता तांत्रिक बाबींच्या आधारे किमान सोलापुरात वाल्मिक कराडच्या लेकाला दिलासा मिळल्याचे कळतेय. याविषयी वकील संतोष न्हावकर यांनी नेमकी काय माहिती दिलीये हे पाहूया.