Pune Doctor Death: पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना घडली आहे. याविषयी पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया.