उद्योग मंत्री उदय सामंत हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आता उदय सामंत यांनी नुकताच एक मोठा दावा केला आहे. “उबाठा गटाचे १० माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे शिवसेनेत सामील होतील”, असं उदय सामंत म्हमाले आहेत.