Sanjay Raut: संजय निरुपम यांनी एक्सवर सैफ अली खानबाबत (Saif Ali Khan) एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “सैफ अली खानच्या पाठीत २.५ इंचाचा चाकू घुसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात गेल्यावर पाठीत रुतलेला चाकू काढण्यात आला. सहा तास शस्त्रक्रिया सुरू होती. पाच दिवसांत उपचार घेऊन सैफ अली खान इतका फिट कसा?” आता संजय निरुपम यांच्या या पोस्टवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.