Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यातील वास्को येथे ४२०० कोटींच्या सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन केले.यानिमित्ताने दक्षिण गोव्याला जोडणारे रस्ते आणि आधुनिक सुविधा प्रदान केल्या जात असल्याचे ते म्हणाले.यावेळी त्यांनी अतिक्रमणाविरोधातही नाराजी व्यक्त केली.