Ladki Bahin Scheme New Update: महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी आज पत्रकारांसमोर दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहीणींचा लाभ सरकारने माघारी घेतला नाही. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर महिलांकडून आम्ही योजनेत पात्र नसल्याने पैसे परत देण्याबाबत अर्ज देत आहेत पण सरकारने कुणाकडून पैसे माघारी घेत नाहीत. असं सांगताना, जो संभ्रम निर्माण झालाय त्याला बळी पडू नका असंही आदिती तटकरेंनी सांगितलं