Jalgaon Pushpak express Accident: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे जवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची प्राथमिक माहिती आहे. पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून ठिणग्या उडाल्या. त्यानंतर आग लागल्याची अफवा उडाल्याने रेल्वेतील प्रवासी खाली उतरले. परंतु, दुसऱ्या रेल्वे लाईनवरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले. जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.