जळगाव मध्ये झालेली दुर्घटनाग्रस्त पुष्पक एक्स्प्रेस रात्री साडे अकरा वाजता कल्याण स्थानकात पोहोचली. या ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवाशांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी कल्याण स्थानकात दाखल झाले होते. आपल्या नातेवाईकांना सुखरूप बघून त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. दरम्यान या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी घडलेला सर्व प्रसंग सांगितला.