Sharad Pawar Reacts On Uddhav Thackeray: शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याच्या विचारात आहेत. गुरुवारी (२३ जानेवारी) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्वबळाचे संकेत दिले. यावर आता शिवसेनेचा (ठाकरे) महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.