संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. या दरम्यान, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे अनेक सीसीटीव्ही फुटेजसमोर आले आहेत. नुकताच पेट्रोल पंपावरील तीन आलीशान गाड्यांचं फुटेज समोर आलं असून वाल्मिक यातूनच बीडमधून पुण्याला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत आमदार सुरेश धस यांना विचारलं असताना त्यांनी आणखी एका व्हिडीओचा उल्लेख केला आहे.