Uday Samant: दावोसवरुन परतल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरीत जंगी स्वागत झालं. दरम्यान आज पत्रकारांशी बोलताना सामंत यांनी ठाकरे गटाला रत्नागिरीत बसणाऱ्या मोठ्या धक्क्याविषयी सुद्धा भाष्य केलं. आजचा पक्षप्रवेश रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी महत्वाचा आहे पूर्वी माझ्यासोबत काम करणारे शिवसेनेचे पदाधिकारी आणि आज सामील होणारे ठाकरे गटातील काही पदाधिकारी यांची ताकद एकत्र झाली तर ११ जिल्हापरिषदेच्या जागा निवडून येतील. पुढील ७-८ दिवसांत अजूनही काही माजी आमदार पक्षात येण्याच्या मनस्थितीत आहेत, माझी त्यांच्याशी चर्चा सुरु आहे, एकनाथ शिंदे यांनी देखील काल त्यांच्याशी संपर्क साधला, जिल्हा पातळीवर मोठी उलथापालथ होईल, असं उदय सामंत म्हणाले.