Guillain-Barré syndrome: राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या ६७ वर पोहोचली असून, त्यातील १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २४ जणांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान मागील काही दिवसात पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांनी नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी याबाबत आवाहन केले आहे.