ST Bus Fare Hike : वाढत्या महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बस तसेच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसला आहे. एसटीच्या भाडेदरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून १५ टक्के वाढ करण्यात आली. एसटीचा प्रवास आता महागल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.