Ajit Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती बिघडली असल्याचं वृत्त काल एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवार यांचे चार दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अशातच शरद पवार यांच्या तब्येतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.