Dombivli Child Falls From Building 3rd Floor: डोंबिवलीतील देवीचा पाडा या भागात दैव बलवत्तर कसं असतं या म्हणीचा अनुभव येणारी एक घटना घडली आहे. १३ मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एक चिमुरडा खाली पडला. मात्र इमारतीत राहणाऱ्या भावेश म्हात्रे नावाच्या तरुणाचे अचानक लक्ष गेलं आणि भावेश यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी झेप घेतली. हा चिमुरडा त्यांच्या हातावर आला आणि नंतर पायावर पडला. यात चिमुकला किरकोळ जखमी झालाय. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे.