Eknath Shinde Viral Video: प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथील साकेत मैदानात आयोजित केलेल्या ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडल्यानंतर मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडून मुंबईला जायला निघाले. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा पूर्व द्रुतगती महामार्गावरून घाटकोपर जवळ आला असता अचानक रस्त्यावर त्यांना एका दुचाकीचा अपघात होऊन तरुण जखमी झाल्याचे दिसले. तत्काळ त्यांनी आपला ताफा रस्त्याच्या बाजूला घेत गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली. दुचाकीवरून पडल्याने या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ इतर तरुणांच्या साथीने त्याला उचलून रुग्णालयात न्यायला सांगितले.