अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला. यातील काही दृश्यांवर नेतेमंडळी, सामाजिक संघटना व शिवप्रेमींकडून आक्षेप घेतला जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवण्यात आलं आहे. या दृश्यांवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. मात्र ही वादग्रस्त दृश्ये आता चित्रपटातून वगळली जातील, असं चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केलं. तसंच या वादादरम्यान उतेकर यांनी आज राज ठाकरे यांचीदेखील भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली? चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य याबद्दल उतेकर काय म्हणाले सविस्तर जाणून घेऊ या.