पुण्यातील राजगुरुनगर शहरात एका कापड दुकानात २६ जानेवारीनिमित्त मार्केटिंग म्हणून महिलांसाठी १ रुपयामध्ये एक ड्रेस देण्याची स्कीम ठेवण्यात आली होती. मात्र महिलांना ड्रेस न देता दुकानदाराने दुकान बंद केलं. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या महिला आक्रमक झाल्या होत्या. एक रुपायात ड्रेस खरेदी करण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती. मात्र दुकानच बंद ठेवल्यान आक्रमक महिलांनी दुकानाबाहेर असणाऱ्या पुतळ्यावरील कपडेही काढून नेले. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणी मध्यस्थी करावी लागली.