बीड पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्हाभरात दहशत माजविणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. सुदर्शन घुले याच्या गँगनंतर आज बीड पोलिसांनी आठवले गँगवर देखील मकोकाची कारवाई केली आहे. १३ डिसेंबर २०२४ ला पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती. त्यातील सहा आरोपींवर ही कारवाई करण्यात आली. यात प्रामुख्याने अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई याचा समावेश आहे. या आरोपींनी आतापर्यंत १९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.