पुण्यात GBS चे एकूण रुग्ण संख्या 101 वरून 111 वर,यापैकी 17 रुग्ण व्हेंटिलेटर वर उपचार सुरू आहे. पुण्यातील किरकिटवाडी, आंबेगाव, नांदेड गाव या भागात रुग्ण सापडले आहेत. पुणे महानगर पालिकेने याबाबत उपाययोजना केल्या आहेत. इंजेक्शनची देखील सोय केली आहे. खाजगी रुग्णालयांनी अतिरिक्त पैसे घेऊ नये यावर लक्ष दिले जात आहे, असंही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नमूद केलं.