सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एकत्रित निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन अंजली दमानियांना दिलं. यावर आज खासदार संजय राऊत यांनी काहीही कारवाई होणार नाही असं पत्रकार परिषदेत म्हटलं. तसंच काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येतील आणि ते भाजपाच्याच गटात बसलेले असतील, असं राऊत म्हणाले.