सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेटी घेतली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी दमानियांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्ट उत्तर देतील आणि ते त्यांनीच द्यावं, अशी माझी सुद्धा इच्छा आहे असं धनंजय मुंडे म्हणाले.