बीड प्रकरणात भाजपाकडून अजित पवारांना टार्गेट केलं जात असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या, असा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री
अजित पवारांना विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की, मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. वरिष्ठ पातळीवरच्या सर्वांशी संपर्क ठेवून आहे. कोण काय म्हणतं याला उत्तर देण्यासाठी मी बांधिल नाही, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.