मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणस्थळी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी भेट दिली. यावेळी देशमुख कुटुंबीयांच्या हातून जरांगेंनी पाण्याचे दोन घोट घेतले. आज सकाळी धनंजय देशमुख सामूहिक उपोषणात सहभागी झाले आहेत. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या आई, पत्नी, मुलगी वैभवी आणि मुलगा विराज देखील उपोषणस्थळी आले. या सर्व देशमुख कुटुंबियांनी जरांगे यांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली.