संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णु चाटेच्या नावावर ४६ कोटी रुपयांची बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. तसेच परळी नगरपरिषदेचं स्पेशल ऑडिट करण्यात आलं पाहिजे, अशी मोठी मागणीही सुरेश धस यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. तसेच एका पोलिसाकडे १५ जेसीबी आणि १०० हायवा असल्याचं मोठं विधानही त्यांनी केलं आहे.