Dhananjay Munde On Resignation: बीड जिल्ह्यातील सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी या भेटीत अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. धनंजय मुंडे म्हणाले, “राजीनामा विषयावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया अजित दादांना भेटल्या आहेत. कागदपत्रांसहित त्या अजित पवारांना भेटल्या. त्यामुळे या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देतील. ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी इच्छा आहे.”