Nitesh Rane Comment Over Burqa: दहावी आणि बारावीची परीक्षा केंद्रांमध्ये बुरखा घालून प्रवेश देऊ नये, असे पत्र मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिले आहे. हिंदू मुलांसाठी वेगळे नियम आणि इतर धर्मियांना वेगळे नियम नको, त्यासोबतच अशा प्रकारामुळे कॉपीचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती देखील राणे यांनी व्यक्त केली आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गरज पडल्यास बुरखाधारींची चौकशी करण्यासाठी महिला पोलीस आणि अधिकारी किंवा शिक्षक यांना चौकशीचे निर्देश शासन स्तरावरुन देण्यात आले आहेत.