राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एका लग्न सोहळ्यादरम्यान भेट झाली होती. यावेळी चंद्रकांत पाटलांनी युती संदर्भात भाष्य केलं. त्यावरून आता अनेक चर्चा रंगल्या आहेत. या संदर्भात खासदार संजय राऊत यांना विचारलं असता अशी भावना भाजपामधील अनेकांची असं ते म्हणाले. तसंच ठाकरे गटातही अनेकांच्या या भावना असू शकतात असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.