Engineering Students Scholarship in 2025: शिक्षण घेत असताना आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा असंख्य विद्यार्थी ठेवतात. म्हणून शिष्यवृत्ती उपक्रम असतो. आता देशभरातील इंजिनिअरिंग शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संधी आर्थिक स्वरूपात चालून आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच ‘एआयसीटीई’तर्फे ‘यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अकादमिक स्किल्स इंटरप्राईसस इनिशिटिव्ह’ म्हणजे ‘यशस्वी २५’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेत ५ हजार २०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येइल. योजनेचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या खास शाखात तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा आहे.