मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळाचा आज पार पडला. विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंचं हे पहिलंच भाषण होतं. यावेळी त्यांनी निवडणुकीतील दारुण पराभव, पंतप्रधान मोदिंना दिलेला पाठिंबा, बदललेली भूमिका याविषयी सविस्तर भाष्य केलं.
त्याचबरोबर भाजपासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांवरही त्यांनी सडकून टीका केली.