Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकर यांनी काल (३० जानेवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि रवींद्र धंगेकर यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात झाली. अशातच आता रवींद्र धंगेकर हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा सुरु झाली. आता रवींद्र धंगेकर यांनी या चर्चेवर मौन सोडलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? या प्रश्नाचं उत्तर रवींद्र धंगेकर यांनी दिलं आहे.