Eknath Shinde Meets Raj Thackeray: वरळी येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल मेळावा पार पडला.त्या मेळाव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या जागांबाबत राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले होते.त्यानंतर अनेक राजकीय नेते मंडळीकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्या,त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते.यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आले.या कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.