भगवान गड मंत्री धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी आहे, अशी भूमिका महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी मांडल्यानंतर आता सर्वच स्तरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे आता नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेणार आहेत. यावेळी सर्व पुरावे देखील घेऊन जाणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.