केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकरी, महिला, करदाते, तरुण वर्ग आदींसाठी कोणत्या विशेष घोषणा केल्या जाणार याकडे प्रमुख लक्ष आहे